फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.डाळिंब हे निरोगी फळांमध्ये प्रथम येते. या फळामध्ये व्हिटॅमिन सी, के, फायबर, फोलेट आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात. जर तुम्ही रोज एक डाळिंबाचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन कधीच कमी होणार नाही. जर तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्यासाठीही डाळिंब उत्तम आहे. डाळिंबमध्ये असलेले फायबर आणि प्रोबायोटिक्स पोटाच्या समस्या टाळण्यास मदत करतात. वृद्ध व्यक्तींनी रोज एक डाळिंब खाल्ले तर त्यांना कधीही सांधेदुखीचा त्रास होत नाही. डाळिंबात आढळणारे फायटोकेमिकल्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात. डाळिंबमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट संयुगे नसांना इजा होऊ देत नाहीत. त्यामुळे मेंदू मजबूत होतो आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.