सावध! अन्न कागद, प्लास्टिक किंवा फॉईलमध्ये गुंडाळताय? कॅन्सर आणि इतर आजारांचा धोका टाळा!

Published by: जयदीप मेढे
Image Source: META

आपण अनेकदा बघतो की डब्यातील चपाती, वडापाव किंवा इतर पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्र, प्लास्टिक किंवा फॉईलमध्ये गुंडाळले जातात.

असं करताना आपण नकळत आरोग्याला मोठा धोका पोहोचवतो, हे अनेकांना माहिती नसतं.

Image Source: META

वर्तमानपत्रात वापरलेली शाई रासायनिक द्रव्यांनी बनलेली असते.

ही रसायनं अन्नाच्या संपर्कात आल्यावर शरीरात जाऊन हानीकारक परिणाम करू शकतात.

Image Source: META

या शाईमध्ये शिसं आणि इतर जड धातू असतात, जे विषारी ठरू शकतात.

हे घटक पचनसंस्थेपासून सुरुवात करून शरीरात कॅन्सरसारखे आजार निर्माण करू शकतात.

Image Source: META

FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा संस्था) च्या मते वर्तमानपत्रांवर अनेक प्रकारचे जीवाणू आणि विषाणू असू शकतात.

जे अन्नात मिसळून पोटाचे विकार आणि संसर्गजन्य आजार वाढवतात.

Image Source: META

प्लास्टिक आणि अ‍ॅल्युमिनियम फॉईलसुद्धा सुरक्षित नाहीत, विशेषतः गरम अन्नासाठी.

गरम पदार्थांशी संपर्कात आल्यावर हे मटेरियल विषारी घटक सोडतात.

Image Source: META

संशोधनातून सिद्ध झालंय की अ‍ॅल्युमिनियम फॉईलमधून अम्लीय आणि क्षारीय द्रावणात घातक पदार्थ बाहेर पडतात.

हे पदार्थ शरीरात गेले की गंभीर आजार उद्भवू शकतात.

Image Source: META

रस्त्यावरील स्टॉल्सवर मिळणारे वडापाव, भजी, भेळ असे पदार्थ पेपरमध्ये गुंडाळलेले असतात.

यातील शाई सतत पोटात गेल्यास हळूहळू शरीरावर परिणाम होतो.

Image Source: META

वर्तमानपत्र हे अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी बनवलेलंच नसतं.

त्याच्या छपाईत स्वच्छता किंवा खाद्य-सुरक्षेचं कोणतंही प्रमाण नसतं.

Image Source: META

आपण पॅक केलेलं अन्न सोयीचं वाटतं, पण त्यासाठी वापरलेलं मटेरियल आरोग्याला धोकादायक ठरू शकतं.

त्यात प्लास्टिक, रासायनं आणि अशुद्ध घटक असतात जे शरीरात जाऊन गंभीर त्रास देतात.

Image Source: META

डॉ. ज्योती मेहता यांच्यानुसार, रस्त्यावर मिळणाऱ्या पेपरमध्ये गुंडाळलेल्या पदार्थांमुळे अनेक आजार होऊ शकतात.

त्यामुळे अशा अन्नाचा वापर शक्य तितका टाळावा आणि आरोग्यस्नेही पर्याय निवडावा.

Image Source: META