केळीमध्ये शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे असतात, विशेषतः व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, आणि मॅग्नेशियम देखील असतात.
केळीमध्ये ग्लूकोज, फ्रक्टोज, सुक्रोज असतात, यामुळे केळी खाल्याने ऊर्जा मिळते. यामुळे व्यायाम करण्याआधी केळी खाणे फायदेशीर आहे.
केळीमध्ये फायबर, पेक्टिन असतात व त्यामुळे पचनक्रियेला मदत होते.
यातील पोटॅशियम आणि सोडियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो व हृदयाचे आजार कमी होण्याची शक्यता असते.
केळीमध्ये अमिनो आम्ल असते. केळी खाल्याने सेरोटिनिन वाढते. यामुळे तणाव कमी होतो.
केळीमद्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबर जास्त असते. यामुळे व्यक्तीला केळी खाल्याने पोट भरल्यासारखं वाटते.
केळीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन असते, यामुळे रोगपासून बचाव करण्याचे काम करते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.