डोळ्याभोवती थंड दूध लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. थंड दूध हे नैसर्गिक क्लिन्झर आहे, जे काळी वर्तुळे कमी करते.
रात्री टी बॅग पाण्यात बुडवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. याने सकाळी डोळ्यांवा शेक द्या. यामध्ये असलेले कॅफिन सूज दूर करण्याचे काम करते.
कच्च्या बटाट्याचा रस काढून कापसाच्या साहाय्याने डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळे कमी करता येतात.
काकडी गोल आकारात कापून डोळ्यांवर ठेवा. या त्वचा डायड्रेड होऊन मुलायम होण्यास मदत होईल, ज्यामुळे आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीच्या जेलने डोळ्यांखाली मसाज करा. रात्रभर राहू द्या आणि सकाळी धुवा. यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी होऊ शकतात.
डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी खोबरेल तेलाने डोळ्यांखाली मसाज करा आणि रात्रभर राहू द्या.
संत्र्याच्या रसात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळा आणि 10-15 मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने धुवा.
टोमॅटोमध्ये लिंबाचे काही थेंब मिसळा आणि 10 मिनिटे डोळ्यांखालील भागावर लावा. हे डार्क सर्कलच्या समस्येवर उपयुक्त ठरेल.
गुलाबाच्या पाण्यात त्वचा उजळण्याचे (Skin Lightening) गुणधर्म आढळतात. 10 मिनिटे कापसाच्या बॉलच्या मदतीने डोळ्यांखाली लावा.
डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी पुदिन्याची पाने बारीक वाटून त्याची पेस्ट डोळ्यांखाली लावा. यानंतर 15 ते 20 मिनिटांनी ते धुवा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.