अनेकदा लोणचं खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट, फायबर यांनी समृद्ध असलेले 'हे' लोणचं औषधी मानलं जातं.
लसोडा हे फळ , भाजी म्हणून किंवा लोणचं बनवून तुम्ही आहारात समाविष्ट करु शकता.
लासोडा हे फळ आहे. लासोडा या फळाला भारतात इंडियन चेरी, सीरियन प्लम, गोंडी, निसोरा अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. त्याचं वैज्ञानिक नाव कॉर्डिया मायक्सा आहे.
लासोडा फळ अत्यंत चमत्कारिक मानले जाते. याचे अनेक औषधी फायदे आहेत. याचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते.
लासोडा कच्चा असल्याचं त्याचं लोणचं बनवलं जातं. याची कच्ची फळे हिरव्या रंगाची असून पिकल्यावर ती गुलाबी किंवा तांबूस रंगाची होतात. पिकल्यावर ही फळे गोड होतात.
लासोडा फळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे याचं सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार टाळता येतात.
लासोडाचे सेवन केल्यान ताप, दमा, खोकला यासारख्या अशा अनेक आजारांपासून आराम मिळतो. हे फळ पुरुषांची शक्ती वाढवणं, नपुंसकता दूर करणे यासाठी देखील उपयुक्त आहे.
लासोडाचं लोणचं खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
या लोणच्याचं सेवन केल्याने दाद, खाज, त्वचेची ॲलर्जी यासारख्या समस्याही दूर होतात. यामध्ये अँटीफंगल गुणधर्म असल्याने हे लाभदायक ठरते.
जर तुमचा घसा दुखत असेल तर लासोड्याचं लोणचं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
लासोड्यामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते. या लोणच्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.