हिवाळ्यातील थंड हवामान काही लोकांसाठी आनंद देणारे ठरते, तर काहींसाठी ते चिंता, तणाव आणि नैराश आणते, याला विंटर ब्लूज असं म्हणतात.
थोडक्यात विंटर ब्लूज म्हणजे हिवाळ्याच्या बदलत्या हवामानामुळे माणसाची मनस्थिती बिघडणे. हा एक प्रकारचा मानसिक ताण आहे.
तज्ज्ञांच्या मते, मौसमी विकार SAD मुळे होतो, ज्याला सामान्यतः विंटर ब्लूज देखील म्हणतात.
अनेकदा थंड हवामानात, लोकांना उदासीनता, थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते, ही विंटर ब्लूज लक्षणे असू शकतात.
विंटर ब्लूज स्थितीत, एखाद्या व्यक्तीला दुःख, थकवा आणि ऊर्जा कमी असल्याचा अनुभव होतो.
थंड वातावरणात सूर्यप्रकाशाची कमतरता, व्हिटॅमिन डीची कमतरता आणि एकटेपणा ही त्याची कारणे असू शकतात.
या ऋतूमध्ये दिवस लहान असतो आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे शरीराच्या जैविक घड्याळावरही परिणाम होतो, त्यामुळे झोपेशी संबंधित समस्याही सुरू होतात.
सतत निराशाजनक गोष्टींचा विचार करणे, सुस्त वाटणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, ही याची इतर लक्षणे आहेत.
अनेक वेळा जेव्हा हवामान बदलते, तेव्हा लोक अशक्त आणि दुःखी किंवा निराश होतात त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.
बऱ्याच वेळा ऋतू बदलामुळे काही लोकांना वाईट वाटते, शरीरात अशक्तपणा आणि निराश वाटते. विशेषतः जेव्हा पाऊस आणि थंडीमुळे तापमानात घसरण सुरू होते, तेव्हा ही लक्षणे दिसतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.