तुमच्या झोपण्याच्या आणि जागण्याच्या सवयींचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येवरच परिणाम होतो, याशिवाय तुमच्या हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो.
जर तुम्हाला दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय नसेल, तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 26% वाढू शकतो.
हेल्थलाइनच्या माहितीनुसार, 40 ते 79 वर्षे वयोगटातील 72,000 हून अधिक व्यक्तींवर यासंदर्भात अभ्यास करण्यात आला होता.
या संशोधनानुसार, झोपेची नियमितता हा हृदयविकाराच्या जोखमीचा एक प्रमुख घटक आहे. झोपेची नियमित वेळ पाळणे झोपेच्या कालावधीपेक्षा अधिक प्रभावी आहे.
संशोधकांनी 'स्लीप रेग्युलॅरिटी इंडेक्स' (SRI) च्या आधारे सहभागींना तीन गटांमध्ये विभागलं.