पाण्याचे सेवन कमी केल्याने शरीरात निर्जलीकरण होते, ज्यामुळे किडनीमध्ये खनिजे जमा होऊ लागतात. तुम्ही पुरेसे पाणी न पिल्यास, तुमच्या किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो आणि हे वारंवार होऊ शकते
मीठ, साखर आणि जास्त फॅट किंवा जास्त प्रथिनेयुक्त आहारामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. चॉकलेट आणि मांसाहारी आहार यांसारखे ऑक्सलेट आणि यूरिक ऍसिड वाढून मुतखडा होऊ शकतो.
जर कुटुंबातील एखाद्याला किडनी स्टोनची समस्या असेल तर तुम्हालाही हा त्रास होण्याचा धोका जास्त असतो. ही अनुवांशिक समस्या असू शकते, जी रोखणे कठीण असू शकते.
व्हिटॅमिन डीचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोन तयार होऊ शकतो, कारण व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियमचे शोषण वाढवते, यामुळे किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.
काही वैद्यकीय परिस्थिती जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह आणि पोटाच्या समस्या असल्याच किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढवते.
व्हिटॅमिन डीचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोन तयार होऊ शकतो, कारण व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियमचे शोषण वाढवते, यामुळे किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.
वारंवार किडनी इंफेक्शनमुळेही स्टोनची समस्या उद्भवू शकते, कारण इंफेक्शनमुळे किडनीमध्ये स्टोन तयार होऊ लागतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.