हिवाळ्यात सर्दी, खोकला किंवा घशाचा संसर्गाची समस्या उद्भवते.
या समस्येपासून आराम मिळावा यासाठीच कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
पण गरम पाणी पिताना काही काळजी घेणे गरजेचे आहे.
कोमट पाणी पिताना लोक पाणी उकळून पितात, हे टाळलं पाहिजे.
पाणी उकळून प्यायल्याने घशात जळजळ होण्याची समस्या होऊ शकते.
याशिवाय किडनी संबंधित आजार होऊ शकतात.
कोमट पाणी पिताना मुबलक प्रमाणात प्यावे,अन्यथा डिहायड्रेशन होऊ शकते.
कोमट पाणी पिताना ते गाळून पिने आवश्यक आहे.
कोमट पाण्यात साखर किंवा गूळ मिसळून पित असाल तर, साखर आणि गुळाचे प्रमाण कमी ठेवा.
रात्रीच्या वेळी कोमट पाणी पिणे टाळा, यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.