आजच्या काळात मोबाईल फोन ही एक मूलभूत गरज बनली आहे.

आपण जिथे जाऊ तिथे फोन आपल्यासोबतच ठेवतो.

काही लोक तर नेहमी फोनचा चार्जर किंवा पॉवरबँक स्वत:सोबत ठेवतात.

बऱ्याच लोकांना रात्री झोपायच्या वेळी फोनला चार्जिंग करण्याची सवय असते.

पण ही सवय फार घातक ठरू शकते.

जेव्हा तुम्ही झोपताना फोन चार्जिंगला लावता, त्यावेळी फोनला 7 ते 8 तास वीज मिळत असते.

जे फोनच्या बॅटरी हेल्थसाठीही फार धोकादायक आहे.

रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेऊ नये.

यामुळे फोनच्या बॅटरीची हेल्थ खराब होते आणि फोनची बॅटरी लवकर बिघडते.

तसेच चार्जर रात्रभर गरम झाल्याने देखील फोनला धोका निर्माण होऊ शकतो.