भाजलेल्या ठिकाणी लगेचच थंड पाणी टाका,त्यामुळे फोड येणार नाही.

थंड पाण्याचा कपडा भाजलेल्या ठिकाणी बांधल्याने जखम चिघळणार नाही.

भाजलेली जागा पाणी किंवा दुधाने साफ करावी त्यानंतर कोरफडीचा गर लावावा.

भाजलेल्या जखमेवर बटाट्याचे काप किंवा साल लावा,त्यामुळे थंड वाटेल.

जखमेवर हळदीचे पाणी लावल्याने वेदना कमी होतात.

मधामुळे जखमेवरील जीवाणू नष्ट होतात.

मध लावल्याने जखम लवकर बरी होण्यास मदत होते.

तुळशीच्या पानांचा रस लावल्याने जखमेचा डाग निघून जातो.

चटका लागलेल्या जागी मीठ चोळल्याने फोड येणार नाहीत आणि थंडावा वाटेल.

खायचा सोडा टाकून मसाज केल्याने जळजळ कमी होते.