उच्च रक्तदाब,मधुमेह आणि वजन वाढलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण जास्त दिसून येतं. हृदयविकारावर आवळा खूपच परिणामकारक ठरतो. आवळा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच रक्तप्रवाह होण्यास मदत होते. सकाळी उपाशीपोटी एक चमचा आवळ्याची पावडर किंवा रस घेतला पाहिजे. हृदयरोगावर मध गुणकारी ठरते. रोज जेवणानंतर एक चमचा मध खावं. अक्रोड,बदाम,अंजीर देखील अत्यंत गुणकारी आहेत. सुकामेवा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हृदयविकार असलेल्या रुग्णासाठी मानसिक ताण अत्यंत घातक ठरतो.