पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर योग्य पद्धतीने पाणी प्यायलो तर बऱ्याचं विकारांपासून आपले रक्षण होते. सकाळी उपाशीपोटी दोन तो तीन ग्लास पाणी प्यावे. व्यायाम करण्याच्या १० मिनिटं आधी एक ग्लास पाणी प्यावे. व्यायाम करुन झाल्यानंतर २० मिनिटांनी पाणी प्यावं. चहा- कॅाफी पिण्याआधी थोडा वेळ पाणी प्यावं, त्यामुळे अॅसिडीटीचा त्रास कमी होतो. अंघोळीच्या थोडावेळ आधी पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणास राहायला मदत होते. झोपण्याच्या अर्धा ते एक तास आधी पाणी प्या. जेवताना पाणी पिणं टाळावे. अशा योग्य वेळी पाणी प्यायल्याने वात, पित्त, आणि कफ यांचा समतोल राहिल.