आपल्या शरीरात कॅल्शियमचा पुरवठा असणं अत्यंत गरजेचं असतं अर्धा चमचा अर्जुन सालीचं चूर्ण पाण्यात किंवा दुधात उकळून दिवसातून दोन वेळा घ्या. याने शरीरातील कॅल्शियमचा पुरवठा नक्की होतो. याचे सेवन केल्यास कंबरदुखी, गुडघेदुखी,मणके झिजणं यांवर आराम मिळतो. आपल्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्यासाठी दररोज देशी गाईच्या ए-२ दुधाचा समावेश आहारात करावा. या दुधापासून तयार केलेलं पदार्थ जसे तूप,चीज,पनीर यांचा समावेश करावा. दररोज एक मूठ ड्रायफ्रुट्स खावेत. रोजच्या आहारात मेथी, पुदिना,पालक,कोथिंबीर, शेंगा या भाजांचा समावेश करावा. त्याचसोबत संत्री, लिंबू,सिताफळ, आंबा, अननस अशी फळे खावीत. आहारात तीळ आणि गुळाचा समावेश केल्यास कॅल्शियमचं प्रमाण वााढण्यास मदत होते.