आइस वॉटर फेस डिप हा त्वचेवर ग्लो आणण्याचा सोपा उपाय आहे.

आइस वॉटर फेस डिप म्हणजे बर्फाच्या थंड पाण्यात चेहरा बुडवणे.

बर्फाच्या थंड पाण्यात चेहरा बुडवून ठेवल्याने त्वचेला आराम मिळतो.

आलिया भट्ट आणि क्रिती सेननसारख्या अनेक अभिनेत्रींच्या सौंदर्यामागचं हे एक गुपित आहे.

आइस वॉटर फेशियल त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी स्किनकेअर उपचार म्हणून वापरतात.

आइस वॉटर फेस डिपचे अनेक फायदे आहेत.

त्वचेची जळजळ शांत करण्यासाठी आइस वॉटर डिप उत्तम पर्याय आहे.

यामुळे चेहऱ्यावरील लालसरपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते

आइस वॉटर डिपमुळे चेहऱ्यावरील छिद्र म्हणजे पोर्स (Pores) चा आकार कमी करण्यास मदत होते.

आइस वॉटर डिपमुळे तुम्ही चेहऱ्यावर स्किनकेअर म्हणून वापरत असलेले प्रोडक्ट त्वचेमध्ये शोषण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.