नखे तुटण्यापासून वाचवण्यासाठी त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच नाही, तर हात-पायांच्या सौंदर्याचीही काळजी घेणं देखील गरजेचं आहे ज्या लोकांची नखं लांब असतात त्यांना अनेकदा त्यांची नखं तुटण्याची भीती असते शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास नखांवरही त्याचा परिणाम होतो याशिवाय काही ब्युटी टिप्स किंवा घरगुती उपायांचा वापर करून नखांना निरोगी आणि चमकदार बनवता येते हे उपाय नेमके कोणते आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात खोबरेल तेलात मीठ मिसळून नखांवर लावा लिंबू कापून तो दिवसातून एकदा तरी नखांना चोळून घ्यायचा आणि पाच मिनिटे कोमट पाण्यात ठेवा एरंडेल तेल आणि खोबरेल तेल मिसळून ते नखांना लावा ऑलिव्ह ऑईल हा खराब झालेल्या नखांसाठी उत्तम पर्याय आहे