स्वयंपाक करण हे प्रत्येक ग्रृहिणीला सहज जमतं. पण हे करत असताना छोट्या -छोट्या घरगुती टिप्स उपयोगी पडतात. आलं लसूण ची पेस्ट दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी मीठा सोबत एक चमचा गरम तेल घ्या. लोणच्यावर भाजलेलं मीठ घालून ठेवल्यास लोणचं अधिक काळ टिकून राहतं. दुध उकळताना भांड्याच्या काठावर तूप लावल तर दुध उतू जाणार नाही. डोसाच्या मिश्रणात भात घातल्यास डोसा सहज काढता येईल. कोबीची भाजी बनवताना तमालपत्र घातल्यास भाजीला उग्र वास येत नाही. फ्राईंग पॅन मधे थोड मीठ टाकल्यास पॅन मधील तेल उडणार नाही. तेलात कांदा तळताना चिमुटभर मीठ टाकल्याने कांद्याला गुलाबी रंग येतो. हिरव्या भाज्या पाण्यात टाकण्यापूर्वी चिमुटभर हळद टाका, भाज्यांचा हिरवेपणा टिकून राहतो.