प्रत्येक आईला एकच प्रश्न असतो की, शाळेत मुलाला टिफीनमध्ये काय दिले पाहिजे.
तर आज आम्ही तुम्हाला अशा रेसिपी सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता.
पराठे: मुलांच्या टिफीनमध्ये तुम्ही त्यांना भरलेले पराठे देऊ शकता.
आजकाल, संपूर्ण गव्हाचा पास्ता आणि मॅकरोनी मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत.
अशा परिस्थितीत जर तुमच्या मुलाने पास्ता खाण्याचा हट्ट केला तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि चीज घालून त्याच्यासाठी संपूर्ण गव्हाचा पास्ता बनवू शकता.
चवीसोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही भाज्यांचा पुलाव, शेवया पुलाव किंवा उपमा बनवू शकता.
तुमच्या मुलांना पोहे आवडत असतील तर तुम्ही बटाटे,वाटाणे आणि कांदे घालून पोहे बनवून त्यांच्या टिफिनमध्ये देऊ शकता.
त्यासोबत आवडीचे कोणतेही फळ द्या जेणेकरून त्याला निरोगी जेवण मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.