मोसंबी वृक्ष रूटेसी कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिट्रस लिमेटा आहे. मोसंब्याच्या फळात सर्वसाधारणपणे 30–50% रस असतो. मोसंबीचा ज्यूस हा आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. मोसंबीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते. मोसंबीमुळे शरिरातील अशक्तपणा दूर होतो. मोसंबीमध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी ते अधिक फायदेशीर ठरतात. नियमित मोसंबीचं सेवन केल्याने चेहऱ्यावर देखील काही दिवसांत ग्लो जाणवतो. मोसंबीमध्ये पॅक्टीन आणि विटामीन सी सोबतच इतर पोषक तत्व सुद्धा असतात. जे कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यासाठी मदत करतात. हृदयरोग होण्यापासून मोसंबी बचाव करते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.