दिवाळीचा सण अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे.



दीपोत्सव म्हणजेच, या दिवशी घरात पुढचे पाच दिवस दिवे लावले जातात,



घरात सुशोभित रांगोळी काढली जाते. आकाशकंदील लावला जातो. फराळांची लगबग सुरु असते तसेच फटाकेही फोडले जातात.



दिवाळीचा सण जसजसा जवळ येतोय तशीच उत्सुकता देखील वाढली आहे. बाजारात देखील विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी आकाशकंदील बाजारात दिसायला सुरुवात झाली आहे.



वसुबारसपासून म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुरुवात होते. मात्र, काही भागांमध्ये 24 ऑक्टोबरपासून म्हणजेच लक्ष्मीपूजनपासून सुरु होते.



दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केल्यानंतर आणि चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून प्रभू श्रीराम सीतेसह अयोध्येत परतले होते.



प्रभू श्रीराम यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी दिवे पेटवून आनंदोत्सव साजरा केला.



दिवाळी सुरू झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी लक्ष्मी पूजन असते, हा दिवस म्हणजे दिवाळी सणाचा मुख्य दिवस असतो.