थंडगार आईस्क्रिम खाणं कोणाला आवडत नाही. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाला आईस्क्रिम खायला आवडते
आइस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स प्रत्येकालाच आकर्षित करतात. बहुतेक लोक थंड होण्यासाठी आईस्क्रीमचे सेवन करतात.
तर, काही लोकांना आईस्क्रिम मिठाईमध्ये खायला आवडते.
मात्र, एक वाटी आईस्क्रिम तुमच्या शरीरात कॉलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी मोठ्या प्रमाणात वाढवू शकते
आईस्क्रिम खाल्ल्याने कोणकोणते नुकसान होते या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
हेल्थ लाइननुसार, जर एखादी व्यक्ती रात्री एक वाटी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर झोपली तर त्याच्या कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरित्या वाढू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही आईस्क्रिमचे जास्त सेवन करू नये.
जर तुम्ही आईस्क्रिमऐवजी दूध आणि साखरयुक्त पेयाचे सेवन केले तर
त्यामुळेही तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरबतचे देखील कमी प्रमाणात सेवन करा.
जर तुम्हाला कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही एॅवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, नट्स आणि फॅटी फिश इत्यादी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करू शकता.