तब्बल 29 वर्षांनी शनी कुंभराशीत प्रवेश करणार आहे



यामुळे देश, राज्य आणि जागतिक पातळीवर याचा परिणाम जाणवेल असा दावा ज्योतिष अभ्यासक डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी यांनी केला आहे



29 एप्रिलला सकाळी 8 वाजता मकर राशीतून कुंभ राशीत म्हणजेच शनीचा स्वराशीत प्रवेश होणार आहे.



12 जुलै 2022 पर्यंत कुंभ राशीत शनीचे भ्रमण आहे, त्यानंतर वक्री होऊन पुन्हा मकर राशीत प्रवेश करणार आहे.



16 जानेवारी 2023 पासून पुन्हा शनीचा कुंभ राशीत होणार प्रवेश आहे.



अशाप्रकारे 29 एप्रिल ते 12 जुलै या कालावधीत शनीच्या भ्रमंतीचा ट्रेलर पाहता येईल, असा अभ्यासकांचा दावा आहे.



शनीच्या विविध राशीत भ्रमंतीमुळे राज्याच्या राजकारणावर परिणाम जाणवू शकतात, असे धारणे म्हणाले



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असा सल्ला ज्योतिष अभ्यासक नरेंद्र धारणे यांनी दिला आहे.