साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात चार ते पाच लवंग ठेवा.

सुकं खोबरं तुरडाळीत ठेवलं तर खराब होत नाही.

जास्त लिंबाच्या रसासाठी पाच ते दहा मिनिटं लिंबू कोमट पाण्यात भिजवावं.

चिमुटभर हळद बटाट्यांमध्ये घातल्यास ते लवकर उकडतात.

तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.

डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.

पुऱ्यांच्या कणकेत साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.

लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा.

शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात मीठ टाकल्याने साल लवकर निघते.

कच्ची केळी ठंड पाण्यात ठेवल्याने आठवडाभर टवटवीत राहतात.