झोप हा रोजचा महत्वाचा दिनक्रम.रात्रीची झोप झाली नाही तर पुढचा पुर्ण दिवसभरआळस जाणवतो.

शांत झोपण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.

रात्री झोपताना दुधासोबत जायफळ पूड एकत्र करुन घेतल्याने लवकर झोप लागते.

मात्र जायफळाचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

पायाच्या तळव्यावर झोपण्यापूर्वी मोहरीचे तेल लावल्याने ही शांत झोप लागण्यास मदत होते.

दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चेहरा,हात,पाय स्वच्छ धुणे यामुळे शांत झोप लागते.

गरम पाण्याने अंघोळ केल्यास सुद्धा झोप शांत लागते.

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिण्याने चांगली झोप लागते.

रात्री केशर किंवा हळद घालून दूध पिणे आरोग्यास फायदेशीर ठरते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.