तंदुरुस्त राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे चांगले मानले जाते.

तुम्ही पाहिलेच असेल की, व्यायाम केल्यानंतर लोक प्रोटीन शेक पितात ज्यामुळे त्यांची स्नायूंची शक्ती वाढते.

काही लोक सकाळी लवकर प्रोटीन शेकचे सेवन करतात. पण प्रोटीन शेक फायदेशीर आहे का?

व्यायामानंतर प्रोटीन पावडर घेतल्याने इन्सुलिनची पातळी मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

म्हणून अशा उत्पादनांचे सेवन करण्यापूर्वी, त्यातील घटक जाणून घेतले पाहिजे.

अनेक वेळा स्वस्त आणि कमी दर्जाचे प्रोटीन शेकही खरेदी केले जातात.

त्यात पारा, आर्सेनिक, कॅडमियम आणि शिसे यासारख्या अत्यंत घातक आणि हानिकारक गोष्टी असतात.

त्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.