मुलांच्या मेंदूच्या विकासासठी 3 ते 6 हे वय महत्त्वाचं. त्यामुळे मेंदूच्या विकासासाठी या वयातच सुरुवात करणं आवश्यक. मुलांना पौष्टिक आहार देणं तितकंच गरजेचं आहे. मुलांसाठी रंगीत फळं आणि भाज्या अत्यंत उपयुक्त . फळं आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व असतात. मुलांच्या आहारात प्रोटिन्सचा समावेश महत्त्वाचा. प्रोटिन्ससाठी अंडी,मासे,चिकन या पदार्थांचा आहारात समावेश करावा. ड्रायफ्रूट्स खाणं मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त. दररोज गूळ आणि कांदा एकत्र करुन जेवताना खाल्ल्यास मेंदूला पोषण मिळतं. पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने त्यांच्या मेंदूला पोषण मिळून त्यांची स्मरणशक्ती वाढते.