आपल्या खाण्यापिण्याची वेळ ही अतिशय महत्वाची आहे . वेळेवर आहार घेतला नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दिवसातून पोटात अनेक आम्ल तयार होतात ज्यामुळे अॅसिडिटीचं प्रमाण वाढतं. हे थांबवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. कोमट पाणी प्यायल्यास अॅसिडिटीवर त्याचा उत्तम फायदा होऊ शकेल. वाढत्या वयानुसार शरीराची कार्यक्षमता कमी होत असल्याने व्यायाम करणं गरजेचं आहे. सगळ्या आजारांचं मुख्य कारण हा रोजचा ताणतणाव आहे. गॅस-अॅसिडिटी याचे कारणसुद्धा तणाव आहे. थंड दुध पिणे. सकस अन्न खाल्यास आपले आरोग्य सुधारते.