आपल्या शरीराची श्वास नलिका साफ करण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे
जेव्हा आपल्या शरीरात कफ वगैरे जमा होतो, तेव्हा आपले शरीर ते खोकल्याद्वारे बाहेर काढून टाकते.
मात्र हा खोकला सलग काही दिवस टिकून राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकते.
रात्री झोपताना अनेक लोकांना कोरडा खोकला येण्याचा त्रास होतो
कोरड्या खोकल्यामुळे तुमची झोप तर खराब होतेच त्याशिवाय छातीतही दुखत राहतं.
पण रात्री उद्भवणाऱ्या या कोरड्या खोकल्यावर घरगुती उपायांनी मात करता येते.
गुळाचा वापर करणं, त्याचं सेवन करणं हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं
त्यामध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे गुळाचे सेवन केल्यास आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.
कोरडा खोकला दूर करण्यासाठी गुळ आणि आलं यांचं सेवन करावं.
आलं किसून त्याचा रस पिणं देखील फायदेशीर ठरते