पेपर कप मध्ये चहा किंवा कॉफी प्याल्यामुळे ऍसिडिटी ची समस्या होऊ शकते . जेव्हा आपण पेपर किंवा प्लास्टिकच्या कपमध्ये गरम चहा किंवा कॉफी ओततो तेव्हा कपच्या आतील पृष्ठभागावरील सूक्ष्म प्लास्टिकचे कण पेयासह विरघळतात ते दूषित करतात आणि ते एखाद्याच्या आरोग्यासाठी धोकादायक बनतात. पेपर कप मध्ये गरम चहा किंवा कॉफी प्यायला ने कपातील पेपर तुटून छोट्या तुकड्यांमध्ये त्याचा बदल होत असतो. हे तुकडे चहा किंवा कॉफीमध्ये मिक्स होत असतात आणि यामुळे आपल्याला ऍसिडिटी होऊ शकते. त्याशिवाय पेपर कपमुळे संक्रमणाचा धोकाही आपल्या शरीराला असतो. पेपरचे पर्यावरणासाठी ही अनेक नुकसान आपल्याला आढळून येतात हे कप लवकर तुटतात आणि नष्टही उशिरा होत असतात . हे कफ जाळले तर नुकसानकारक रसायन बाहेर सोडत असतात जे वायू प्रदूषणाचे कारण बनतात आणि हे देखील आपल्या शरीरासाठी खूप घातक असतात टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.