जर तुम्ही दररोज पाच ते सहा कप पेक्षा जास्त चहा पीत असाल तर.. तुम्ही आजारांना आमंत्रित करत आहात. अति चहा पिल्यामुळे तुम्हाला अनेक आजार जडू शकतात. चहाच्या अतिसेवनाने मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. त्यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. ब्राऊन युनिवर्सिटीच्या रिपोर्ट्सनुसार, ग्रीन आणि ब्राऊन चहामध्ये प्रति कप 40 मिलीग्रॅम कॅफीन असते. त्यामुळे चहाचे अति सेवन केल्यामुळे तुम्हाला व्यसन लागू शकते. जर तुम्ही जास्त चहाचे सेवन केले तर तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक आजारांचा धोका होऊ शकतो. जास्त चहा प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी सारखी समस्या उद्भवते. चहाच्या अतिसेवनामुळे मळमळ सारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे उलटीची समस्या वाढते. बरेच लोक दिवसातून 3-4 वेळा चहा पितात. जास्त चहा प्यायल्याने पोटात ऍसिडिटी वाढते. जास्त चहा प्यायल्यानेही आतडे खराब होतात. त्यामुळे अन्न पचण्यात देखील अडचणी येतात टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.