घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलची किंवा वेलची पावडर मिसळून प्या.

नाकात तूप टाकून झोपा

घोरणे थांबवण्यासाठी तूप हा एक प्रभावी उपाय मानला जातो.
नाकात तूप टाकण्यासाठी ते गरम करून थोडे थंड झाल्यावर नाकात टाकावे.

हळद

हळदीमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात,जे जळजळ आणि घोरणे बरे करण्यास मदत करतात.

तुमची झोपण्याची स्थिती बदला जर तुम्ही नियमितपणे घोरत असाल तर बहुधा तुम्ही तुमच्या पाठीवर झोपत असाल.

तुमच्या पाठीवर झोपल्याने तुमची जीभ मागे सरकते ज्यामुळे श्वासनलिका अर्धवट ब्लॉक होते आणि घोरणे सुरू होते.

त्यामुळे, जर तुमच्या घोरण्याचे हे कारण असेल तर तुमच्या झोपण्याची स्थिती बदला.

ऑलिव ऑइल आणि मध

ऑलिव्ह ऑईल आणि मध घोरण्यापासून आराम मिळवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

1 चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये 2 ते 4 थेंब मध टाकून रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा. काही दिवसातच तुम्हाला त्याचा फरक दिसेल.

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.