हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्या निर्माण होतात.

या थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, घसा खवखवणे यांसारखे विषाणूजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो.

काहींना या ऋतूमध्ये अनेकदा घसा खवखवण्याचा त्रास होतो.

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत.

हळदीचे पाणी

शतकानुशतके हळदीचा उपयोग आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातोय.

तुम्ही हळद आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता, ज्यामुळे घशातील खवखवण्यापासून लवकर आराम मिळेल.

आलं आणि तुळस हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुळशी आणि आल्याचा चहा खूप फायदेशीर मानला जातो.

हे प्यायल्याने खोकल्याची समस्या दूर होते.आलं आणि तुळस या दोन्हीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात.

मध आणि दालचिनी

आयुर्वेदात दालचिनी आणि मध औषधी म्हणून वापरले गेले आहेत.

दालचिनी पावडर अर्धे पाणी असेपर्यंत उकळवा. यानंतर गाळून मध मिसळा. हे प्यायल्याने घशाचा जडपणा आणि दुखणे कमी होते.

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही