रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी लसणाचे सेवन उपयोगी ठरू शकते. उच्च रक्तदाब पीडित व्यक्तीला दररोज काही लसणाच्या पाकळ्या खायला द्याव्यात. लसूण वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी काही गुणकारी ठरतो,याशिवाय लसणाच्या सेवनाने शरीरात उष्णता वाढते ज्यामुळे अनावश्यक चरबी बर्न होण्यात मदत मिळते. लसूण मध्ये अँटिबायोटिक आणि अँटी व्हायरल गुण असतात. सर्दी आणि खोकल्याच्या समस्यांमध्ये लसूण एक अद्भुत उपचार आहे. दररोज 4-5 लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप 1 ते 2 दिवसात दूर होतो. लसूण पचन शक्ती वाढवून पोटासंबंधी आजार दूर करतो. यासोबतच शरीरात असणाऱ्या घातक पदार्थांनाही नष्ट करतो. डोके अथवा छाती दुखण्याची समस्या असल्यास लसणाच्या पाकळ्या दुखत असलेल्या जागी चोळाव्यात. असे केल्याने वेदना कमी होतात. टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.