अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकलं असेल, की सध्या भूकच लागत नाही. जेव्हा लागते तेव्हा जास्त खावं वाटत नाही.

त्यामुळे शरीरात खूप अशक्तपणा येतो. अनेकदा लोकांना आरोग्याशी संबंधित काही गोष्टी माहीत नसतात.

ही समस्याच आजच्या धावपळीच्या काळात अनेकांमध्ये दिसते.

जाणून घ्या यावर मात करण्याचे काही घरगुती उपाय. यातून भूक नक्कीच वाढेल.

रोज सकाळी ओव्याचे सेवन करावे. यामुळे तुमची भूकेची समस्या बर्‍याच प्रमाणात दूर होते.

तुम्ही चिंचेचे सेवन देखील करू शकता, याच्या सेवनाने तुमची भूक वाढेल आणि तुमच्या शरीरात अशक्तपणा येणार नाही.

असे म्हटले जाते की कोथिंबीरचे सेवन केल्याने तुमची भूक वाढण्यास खूप मदत होते आणि तुमच्या शरीरातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

बडीशेप चा चहा देखील तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे पाणी तुम्ही बडीशेप आणि मेथीचे दाणे मिसळूनही पिऊ शकता.

जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पोट साफ राहते आणि भूक लागते. त्यामुळे रोज सकाळी याचे सेवन करावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.