तुमची त्वचा नेहमी तरुण, चमकणारी आणि मुलायम राहावी असे तुम्हाला वाटते का?

या फळांच्या सालींमुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढू शकते.

त्यामुळे ही फळे खा आणि त्यांच्या सालीने तुमच्या त्वचेची काळजी घ्या.

संत्र्याची सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असते जे त्वचेसाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते.

त्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक सारखे घटक आढळतात.

ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. त्यामुळे केळीच्या सालीने चेहरा आणि त्वचा या दोन्हींचे सौंदर्य वाढवता येते.

पपईच्या सालीमध्ये पपेन हे नैसर्गिक एन्झाइम आढळते. हे एन्झाइम त्वचेतून मृत आणि खराब झालेल्या पेशी साफ करण्यास मदत करते.

पपईची साल बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने डाग हळूहळू नाहीसे होतात आणि त्वचा मुलायम आणि चमकदार होते.