एकाच जागी जास्त वेळ बसल्यावर हातापायांना मुंग्या येऊ लागतात.

यामुळे शरीरातील रक्ताभिसरण नीट होत नाही.

काही लोक या त्रासाने खूप त्रस्त आहेत.

तुमच्या हाता-पायांना मुंग्या येण्याची अनेक कारणे असू शकतात.

व्हिटॅमिनची कमतरता, मधुमेह आणि शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल यांसारखी अनेक कारणे असू शकतात.

या परिस्थितीमध्ये हात किंवा पाय हलवले जात नाहीत.

हा त्रास सुरु झाला की हाता-पायांना प्रचंड वेदनाही जाणवतात.

यासाठी आहारात अॅव्होकॅडोचा समावेश करा.

सूर्यफूल तेल आणि राजमा यांचा आहारात समावेश करा.

या समस्येवर मात करण्यासाठी बदामही फार उपयुक्त आहेत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.