मुळा हे एक कंदमुळ असल्यामुळे मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते.

मुळा खाल्याने तुमच्या पचनक्रियेस देखील मदत होते. तुम्हाला जर अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर मुळा खाणे तुमच्यासाठी चांगले ठरु शकते.

मुळ्यामध्ये क जीवनसत्त्व असते त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.

मुळ्यामुळे लाल रक्तपेशी वाढण्यास देखील मदत होते आणि रक्तामधील ऑक्सीजनचे प्रमाण वाढवण्यास देखील मुळा मदत करतो.

मुळ्यामध्ये अँथोसायनिन नावाचे फ्लेव्होनॉइडचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील मुळा फायदेशीर ठरु शकतो.

मुळ्यामध्ये पोटेशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण न होण्यास मदत होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.