पालकाचा रस पिणे अनेकांना आवडते आणि त्याचे फायदे देखील जास्त आहेत.

पण,तुम्हाला माहित आहे का पालकाचा रसाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

जर एखाद्याने पालकाचा रस जास्त प्रमाणात घेतला तर त्याला किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.

जर एखाद्याला आधीच लोहाची कमतरता किंवा ॲनिमियाचा त्रास असेल तर त्यांनी पालकाच्या रसाचे सेवन करू नये.

पालकाचा रस प्यायल्याने काही लोकांच्या पोटात गॅस तयार होतो किंवा जुलाब होऊ शकतात.

पालकाच्या रसाचे सेवन केल्याने काही लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो.

तुमच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल माहिती ठेवा.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर एकदा डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्यासाठी बनवलेला योग्य आहार चार्ट मिळवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.