चेरी हे सर्वात फायदेशीर फळांपैकी एक मानले जाते.

चेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात.

चेरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते.

त्यामुळे शरीरातून जास्त प्रमाणात सोडियमचे प्रमाण काढून टाकण्यात आणि रक्तदाब पातळी संतुलित करण्यात मदत होऊ शकते.

चेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात.

त्याचबरोबर बीपी नियंत्रित करतात आणि मुक्त रॅडिकल्सशी लढतात .

चेरीचे सेवन त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

चेरीमध्ये पॉलिफेनॉल असतात जे त्वचेला हायड्रेटेड, कोमल आणि मऊ ठेवण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठतेच्या समस्येतही चेरीचे सेवन केल्याने फायदा होतो. चेरीमध्ये असलेले फायबर पोटाशी संबंधित समस्या दूर करते.

टीप :वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.