केस गळणे ही अनेकांची समस्या आहे.मानसिक ताण, प्रदूषण,आणि इतर शारीरीक आजार ही केस गळतीची काही मुख्य कारणे आहेत.

केस गळती थांबविण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता.

अॅलोवेरा जेल आणि कांद्याचा रस 3 चमचा कांद्याच्या रसात 2 चमचे अॅलोवेरा जेल मिक्स करा.

हे मिश्रण केसांवर लावून 30 मिनिट ठेवा.त्यानंतर शॅम्पूने केस धुवून टाका.

कांद्याच्या रसामुळे केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

केस गळतीच्या उपचारांसाठी मेथीही अतिशय चांगली असती.

भिजवलेल्या मेथीची पेस्ट तयार करून केसांना लावा 40 मिनिटांनी केस धुवून टाका.

महिन्यातून एकदा हा उपाय करा,तुम्हाला परिणाम दिसेल.

नैसर्गिक आणि लवकर केस वाढण्यासाठी आवळ्याचा वापर करा.आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं.

त्याच्यामुळे केसगळतीच्या अडचणी दूर होतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.