मेथी दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. मेथीचे दाणे रात्रभर गरम पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी प्यायल्यास उच्च रक्तदाब कमी होतो. एक चमचा मेथी दाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते. मेथी दाणा आणि सुंठची पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून घेतल्याने फायदा होतो. केसांमध्ये कोंडा झाला असेल,तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावावी. गॅस आणि कफ दूर करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. मेथीचे चूर्ण खाल्याने वात रोग दूर होतात. मेथी दाण्यामधील फायबर आणि स्टेरॉइडमुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यासोबत घ्यावेत. मेथी दाण्याची पेस्ट तयार करुन त्वचेला लावल्यास व्रण दूर होतात.