स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होत असेल तर पाळीच्या २ दिवसाआधीपासून अर्धा चमचा काळ्या तिळाची पूड गरम पाण्यातून २ घ्यावी.

मुलांन बिछाना ओला करण्याचा त्रास असल्यास त्यांना तिळची चिक्की खायला दिल्याने फायदा होतो.

तिळाच्या तेलाने लहान मुलांची मालिश केल्यास त्यांची हाडं बळकट होतात.

लघवी करताना काही त्रास होत असेल तर तिळाचे लाडू दिवसातून २-३वेळा खावेत.

मूळव्याधाचा त्रास असेल तर तीळ वाटून लोण्यासोबत खाल्लास आराम मिळतो.

काळे तीळ आणि खडीसाखर एकत्र वाटून त्याचं चूर्ण तयार करावं. हे खाल्ल्यास रक्ती मूळव्याध बरी होते.

जुलबाचा त्रास होत असल्यास १ चमचा भाजलेल्या तिळाची पूड, १ चमचा गायीचं तूप आणि ६ चमचे शेळीचं दूध एकत्र करुन दिवसातून ३ वेळा घ्यावं.

पोट दुखत असेल किंवा फुगलं असेल तर तिळाच्या तेलात हिंग घालून मालिश केल्याने आराम मिळतो.

संधीवाताचा त्रास असल्यास तिळाच्या तेलात थोडं हिंग, मोहरी, ओवा किंवा सूंठ घालून ते तेल गरम करुन जर मसाज केला तर आराम मिळतो.

अशक्त तरुणींना मासिक पाळीदरम्यान त्रास होत असल्यास १ चमचा काळे तीळ, अर्धा चमचा ओवा, पाण्यात घालून ते पाणी आटवावं व गूळ घालून प्यावं.