सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रथिने, जस्त, फायबर हे घटक आढळतात.

तुम्ही सूर्यफुलाच्या बिया सोलून कच्च्या खाऊ शकता.

तसेच या बिया मीठ लावून भाजून देखील तुम्ही खाऊ शकतात.

दररोज मूठभर सूर्यफुलाच्या बियांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

पण, यामध्ये कॅलरीज आणि सोडियम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जास्त खाणे टाळावे.

त्याचबरोबर कॅडमियम नावाच्या घटकाचे प्रमाण देखील जास्त असते.

याचे जास्त सेवन केल्यास किडनी खराब होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करावे.

त्यात जीवनसत्वे, पोट्याशियम, मॅग्नेशियम इत्यादी घटक आढळतात.

त्यामुळे याचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.