तणावावर नियंत्रण ठेवायला शिकल्यास अनेक गंभीर आजार टाळता येतात. तुम्ही तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवावे अती विचार करणे टाळावे. तणावपूर्ण वातावरणात आक्रमक होण्याऐवजी नेहमी संयम ठेवायला हवा. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. वेळेचा योग्य वापर करायला हवा. यामुळे तुम्ही व्यस्त राहाल. सर्वात जास्त तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखावा आणि त्या टाळाव्यात. तणाव कमी करण्यासाठी अल्कोहोल, ड्रग्ज किंवा मादक पदार्थ टाळा. या गोष्टी नेहमी टाळल्या पाहिजेत. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि कुटुंबासोबत तुम्ही पुरेसा वेळ घालवू शकता. तणाव कमी होत नसल्यास, मानसशास्त्रज्ञाना तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकता.