पिस्ता खाल्ल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते.



पिस्त्यात लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. यामुळे अॅनिमियासारख्या समस्या दूर होतात आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.



पिस्त्यामध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आढळतात, जे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहेत.



नियमित पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. त्यामुळे पोटाचा आणि पचनाचा त्रास होत नाही. पिस्ता खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.



पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. हे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. आपल्याला जास्त भूक लागत नाही, आपण जास्त खाणे टाळतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.



अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, पिस्ता खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक पातळी, रक्तदाब, जळजळ आणि लठ्ठपणाची समस्या कमी होते.