नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वासोळ गावच्या हेमंत देसाई या तरुण शेतकऱ्याने



आपल्या शेतात ही रंगीत फ्लॉवर कोबी फुलवली आहे.



या रंगीत फ्लॉवर कोबीच्या शेतीतून ते चांगले उत्पादन देखील मिळवत आहेत.



रंगीत जांभळ्या, पिवळ्या रंगाच्या कोबीचे वैशिष्ट्य म्हणजे या कोबीत व्हिटॅमीन 'ए' चे प्रमाण आहे.



व्हिटॅमीन ए असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत आहे.



त्यात अधिक पोषकतत्वे असल्याने शहरी भागात या फ्लॉवर कोबीला मोठी मागणी आहे.



लोकांची या रंगीत कोबीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.