अननस हे एक असं फळ आहे, जे तुमचे वजन कमी करण्यास फार उपयुक्त आहे. अननस खाण्याचे नेमके कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया. 1. अननसमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज खूप कमी असतात. अननस खाल्ल्याने वजन कमी होते. 2. अननसात मोठ्या प्रमाणात ब्रोमेलेन फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. 3. अननस खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रित करता येते. लवकर भूक लागत नाही. 4. अननस खाल्ल्याने शरीरातील लेप्टिन हार्मोन कमी होतो, ज्याद्वारे वजन नियंत्रित ठेवता येते. 5. अननसाचे सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते 6. यामध्ये मॅगनीज आणि कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. 7. अननसमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे दमा आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते. 8. अननस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत नाही. 9. अननसाचे सेवन केल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका टाळता येतो. 10. अननस खाल्ल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.