लिचीमुळे शरीर थंड राहते. तसेच मेटाबॉलिज्म देखील मजबूत होते. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे 80 टक्के हायड्रेटेड फळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या फळाचं सेवन करावं. लिची ह्रदयासाठी अत्यंत चांगले फळं आहे. पोटॅशियमचे प्रमाण लिचीमध्ये जास्त असते. लिची खाल्ल्यानं शरीरामध्ये इम्यूनिटी वाढते. लिचीमध्ये जास्त प्रमाणात विटॅमिन सी असते. लिची खाल्यानं पचन क्रिया मजबूत होते. त्यामुळे वजन कमी होते. लिची खाल्यानं तुमच्या त्वचेवर झटपट ग्लो देखील येतो. लिचीमध्ये अँटीऑक्सिडेट्स असतात. तसेच फायबरचे प्रमाण देखील लिचीमध्ये जास्त असतं. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.