जास्वंदाचे झाड आणि फुल हे दोन्ही औषधी आणि खूप गुणकारी आहेत. जास्वंदाचे फुलाचे सेवन केल्यास आपल्या शरीरातील हिमोग्लोबीएनचे प्रमाण वाढू शकते. जास्वंदाचे फुल आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे . जास्वंदाच्या फुलांच्या पावडरचा केसांसाठी नियमित वापर केल्यास केस मुलायम आणि चमकदार होतात. जास्वंदाचा वापर केल्यास केसांचे आरोग्य सुधारते आणि केस लांब होण्यास मदत होते. केस खूप गळत असतील जास्वंदाची फुले आणि पाने सुकवून त्याची पावडर बनवून नियमित आपल्या केसांना लावावी. यामुळे केस गळती थांबण्यास मदत होईल आणि केसातील कोंडा दूर होण्यास मदत होईल. जास्वंदाच्या फुलाचा उपयोग आपल्या शरीरावरील काळे डाग, खाज, सूज, पिंपल्स कमी करण्यास देखील होतो. जास्वंदाच्या फुलामध्ये अँटी ऑक्सिटडेंट आणि व्हिटॅमिन सी अशी जीवनसत्व असतात. केस पांढरे झाले असल्यास जास्वंदाच्या फुलाचा रस करुन लावल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होऊ शकते.