तुपामध्ये इतर तेलांप्रमाणे फॅट नसते. तूप हे एक सुपरफूड आहे जे आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून आराम देते. तूप जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के, तसेच निरोगी फॅटी ऍसिडसह आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. तुपामुळे सूज, घसा आणि फुफ्फुसातील संक्रमण बरं करण्यास मदत होते. तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरातील सूज कमी होते. तुपाने बॅक्टेरियावर मार करता येते. तुपामुळे तुम्ही तंदुरूस्त राहता. तुम्हाला ताप, खोकला किंवा सर्दी झाल्यास तूप थोडं गरम करून वापरू शकता. तूप आणि काळी मिरी यांचे हे मिश्रण रक्तसंचय दूर करण्यात आणि घसा खवखवणे कमी करण्यास मदत करू शकते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.